रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (16:11 IST)

मुंबईतील वरळी-बांद्रा सी लिंकवरची वाहतूकीसाठी बंद

मुंबईत समुद्रातून जाणारा वरळी-बांद्रा सी लिंकवरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच जितामाता उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. समुद्राच्या मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगही वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सी लिंकवरील वाहतूक पोलिसांनी थांबवली आहे.
 
भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातही प्राण्यांची काळजी घेण्यात आली आहे. उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. विशेषतः वाघ, बिबट्या अशा प्राण्यांना खुल्या जागेतून बंदिस्त जागेत हलविण्यात आले आहे. जेणेकरून झाडं पडल्यास त्यांना इजा होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे.