रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (11:20 IST)

जोगेश्वरीत नोकराने केला मालकाचा खून, मालकिणीवर खुनी हल्ला

murder
जोगेश्वरी येथील मेघवाडी परिसरात मालक आणि मालकिणीवर खुनी हल्ला करून नोकर फरार झाला. या घटनेत मालक सुधीर चिपळूणकर यांचा मृत्यू झाला, तर मालकीण सुप्रिया चिपळूणकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयित पप्पू कोळीला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर चिपळूणकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया चिपळूणकर हे जोगेश्वरी पूर्व येथील श्री समर्थ सोसायटीत राहत होते. सोमवारी रात्री उशिरा नोकर पप्पू याने मालक आणि त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ सुधीर आणि सुप्रिया यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी सुधीरला मृत घोषित केले. रुग्णालयात सुप्रिया चिपळूणकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार चिपळूणकर यांची मुलं परदेशात राहतात. अशात यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी ऑनलाइन खासगी एजन्सीमधून पप्पू कोळी याला केअर टेकर म्हणून नेमलं होतं. परंतु त्या केअर टेकरने चोरीच्या उद्देशाने चिपळूणकर दाम्पत्यावर हल्ला केला. 
 
पोलिसांनी पप्पूची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा असल्याची बाब उघडकीस आली आहे अशात एजन्सीमार्फत नियुक्त करुन सुद्धा सुरक्षेची हमी नसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.