बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (15:35 IST)

नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला : मुख्यमंत्री

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता विद्या बाळ यांच्या निधनाने नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. 
 
अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाताना त्यांना बोलते करायचे काम केले, असे मख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 
 
'मिळून सार्‍याजणी' या मासिकाच्या माध्यमातून स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रियांचे हक्क यासाठी सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अतिशय अभ्यासपूर्ण परंतु संयमी विवेचन, महिलांविषयक कामांचा व्यासंगी अभ्यास असलेल्या विद्या बाळ या राज्यातील अनेक अत्याचारग्रस्तम महिलांच्या आधारस्तंभ बनल्या. मिळून सार्‍याजणी, नारी समता मंच, ग्रोईंग टुगेदर, बोलते व्हा, दोस्ती जिंदाबाद यासारख्या व्यासपीठावरून महिला हक्कांचा आवाज अधिक गहिरा आणि संवेदनशीलपणे व्यक्त होत राहिला. रात्रीच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत म्हणून हातात टॉर्च घेऊन काढलेली त्यांची 'प्रकाश फेरी' कायम 
लक्षात राहिली.