रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (13:45 IST)

ट्रॅव्हल्स कंपनींच्या वाहन चालकांवर कारवाई

बिना परवाना, टॅक्स संपल्यावरही अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या 114 वाहन चालकांवर वाशी प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये नीता, श्रावणी यांसारख्या नांमाकित ट्रॅव्हल्स कंपनींच्या वाहन चालकांचाही समावेश आहे.
 
पनवेल-सायन महामार्गावर वाशी, नेरुळ, बेलापूर आणि ऐरोली भागातून बसमधून राज्यात ठिक-ठिकाणी घेऊन जाणाऱ्या 114 बसेस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सगळ्या बसेसची परवानगी आणि वाहनचालकांचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. ही कारवाई वाशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघूल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .
 
सहा प्रादेशिक नियंत्रकांनी सलग सहा दिवस ही मोहीम राबवली. सलग सहा दिवस दररोज सलग 24 तास केलेल्या तपासणीत 475 वाहनांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी 114 बसेसमध्ये अवैध कार्गो, परमिट आणि टॅक्स संपलं असल्याचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे यात सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस होत्या. या सर्व बसेसला ताब्यात घेऊन त्यांची परवानगी रद्द करण्यात आली आणि वाहनचालकांचेही परवाने रद्द करण्यात आले. या कारवाईमुळे वाशी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर जप्त केलेल्या वाहनांची रांग लागली आहे.