मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (18:49 IST)

मोठी बातमी , हैदराबाद प्राणी संग्रहालयातील 8 सिंहांना कोरोनाची लागण

हैदराबाद: एकीकडे, कोरोनाव्हायरसने सर्वीकडे उच्छाद मांडला आहे, मानवांमध्ये कोरोनाने कहर केला आहे तर आता प्राण्यांमध्ये देखील कोरोनासंसर्ग लागण्याची बातमी येत आहे. ताज्या माहितीनुसार हैदराबाद नेहरू प्राणिशास्त्र(ज्यूलोजिकल) पार्कच्या 8 आशियाई सिंहांना कोरोनाची बाधा झाली आहे.    
 
एखाद्या प्राण्याला कोरोना संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यावर ही देशातली ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जाते. असं म्हणतात की जेव्हा सिंहांमधील कोरोनाची लक्षणे दिसली तेव्हा पार्क कर्मचार्‍यांनी त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली .
सिंहांना खोकला, नाक वाहणे आणि भूक न लागणे ही लक्षणे कर्मचार्‍यांना दिसली होती. यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली.त्यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आला. 
उल्लेखनीय आहे की आतापर्यंत वन्यजीव तज्ञांचा असा विश्वास होता की कोरोना संसर्ग प्राण्यांमध्ये होत नाही, परंतु ही बातमी नक्कीच भीतीदायक आहे.