गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (14:03 IST)

जम्मू काश्‍मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षादलावर दहशवाद्यांचा हल्ल्यात 10 जण गंभीर जखमी

हल्ल्यात 10 जण गंभीर जखमी:जखमींमध्ये स्थानिक नागरिकांचा समावेश
 
जम्मू-काश्‍मीर: जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षादलावर दहशदवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर ग्रेनेड फेकले आहेत. अनंतनाग येथील उपायुक्त कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 10 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्यालयाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि तेथून पळ काढला. दरम्यान, या हल्ल्यात 5 जण जखमी झाले असून जखमींमध्ये स्थानिक नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हल्ला झालेल्या परिसराला सील करण्यात आले आहे तसेच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी तपास करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.