गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (11:03 IST)

अभिनेत्री जया बच्चन पुन्हा राज्यसभेत जाणार ?

सलग तीन वेळा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर गेलेल्या अभिनेत्री जया बच्चन तृणमूल काँग्रेसच्या गोटात दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी घेतील.  18 मार्च रोजी घोषणा होण्याची शक्यता आहे. 

एप्रिल महिन्यात राज्यसभेतील 58 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यात जया बच्चन यांच्या देखील समावेश आहे. या 58 पैकी 10 खासदार उत्तर प्रदेशमधून निवडले जाणार आहे.  राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला 403 पैकी 312 जागा मिळाल्या असल्याने समाजवादी पक्षाकडे राज्यसभेवर पाठवण्यासाठी एकच जागा आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशमधून सपाच्या तिकीटावर राज्यसभा सदस्य असलेल्या जया बच्चन यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.   

दुसरीकडे तृणमूलचे राज्यसभेतील चार खासदार निवृत्त होत आहेत. त्यापैकी दोघांना पुन्हा संधी देऊन दोन नवे चेहेरे राज्यसभेवर पाठवणार असल्याचे तृणमूलमधील सूत्रांनी सांगितले. जया बच्चन यांचे बंगालशी जवळचे नाते आहे. तर पती सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मी बंगालचा जावई असल्याचे म्हटले होते. या सर्व कारणामुळेच तृणमूल जया बच्चन यांच्या नावाचा विचार करत आहे.