शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (12:48 IST)

हिरव्या रंगापासून स्वत:चा बचाव करतात पंतप्रधान

काँग्रेस संसद शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. शशी थरूर यांनी म्हटले की पंतप्रधान डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या धारण करतात पण मुस्लिम टोपी घालत नाही? थरूर यांनी पंतप्रधानांकडून याचा जाब मागितला आहे.
 
शशि थरूर तिरुवनंतपुरममध्ये 'नफरत के खिलाफ : वर्तमान भारत में हिंसा और असहनशीलता' आयोजित कार्यक्रमात बोलत होते. थरूर यांनी म्हटले की नरेंद्र मोदी यांना वेग वेगळे कपडे धारण करताना बघितले आहे पण ते कधीही मुस्लिम टोपी घालत नाही. 
 
त्यांनी सांगितले की ते हिरवा रंग घालत नाही. थरूर यांनी स्वामी अग्निवेश यांच्याबद्दल बोलत म्हटले की झारखंडच्या पाकुड़मध्ये मागील महिन्यात त्यांच्यावर हल्ला झाला होता. जर स्वामी विवेकानंद आज भारतात असते तर आज त्या गुंड्यांच्या निशाण्यांवर असते. शशी थरूर यांनी म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत मिळून पक्ष आणि आरएसएसवर कब्जा केला आहे.