रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बहिणीने रिमोट दिला नाही, मग लावला फास

दिल्लीत  सेक्टर 12 मध्ये बहिणीने रिमोट न दिल्यामुळे दुसऱ्या बहिणीने  खेळत असताना ओढणी गळ्याला बांधली आणि तिला फास लागला.
 
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार,  या 10 वर्षाच्या मुलीने मानुषी रावतने आपल्या मोठ्या बहिणीकडे रिमोट मागितला होता. मात्र मोठ्या बहिणीने विरोध केल्यामुळे दुसऱ्या खोलीत खेळायला गेली आणि हा प्रकार घडला.  सदरची घटना कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने मुलीला मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारा दरम्यान डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषित केलं. मानुषी आपल्या मोठ्या बहिणीसोबत घरी खेळत होती. या दोन्ही मुलींना आई वडिल एकटेच ठेवून कामाला निघून गेले होते. वादळ आल्यामुळे या दोन्ही मुलींच्या शाळा बंद होत्या.