सोमवार, 11 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 15 जून 2022 (14:51 IST)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दिल्लीकडे प्रयाण

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीनंतर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.
 
येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, तिन्ही सैन्य दलाचे व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.