सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (17:30 IST)

बुलेट प्रेमींना हादरवणारा व्हिडीओ, नवीन रॉयल एनफिल्डचे काय झाले पहा

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एका रॉयल एनफिल्ड मोटरसायकलला अचानक आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मंदिराबाहेर पार्क केलेल्या नवीन दुचाकीसोबत ही घटना घडली. मोटारसायकलचा मालक रविचंद्र म्हैसूर (सुमारे 387 किमी दूर) येथून नॉन-स्टॉप चालवून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर गुंटकल मंडलातील नेतिकांती अंजनेय स्वामी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. या तरुणांने  मंदिरात प्रवेश करताच बुलेटने पेट घेतला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बुलेटला आधी आग लागल्याचे दिसले आणि त्यानंतर पेट्रोल टाकीचा स्फोट झाला, त्यामुळे परिसरातील लोक स्तब्ध झाले. त्यांनी गाडीवर पाणी टाकून आग विझवली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र नव्या कोऱ्या बुलेट आगीत जळाली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.