बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (11:42 IST)

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय १०

श्रीगणेशायनमः ॥ सकलतीर्थाचेंवसतीस्थान ॥ तेएकजगदंबेचेचरण ॥ सकळयागाचेंश्रेयपूर्ण ॥ तेंएकाअर्चनअंबेचें ॥१॥
सकळयोगांचेंसाधन ॥ तेंएकजदंबेचेंध्यान ॥ सकळ्यारापर्यटन ॥ होयप्रदक्षनाकरितांची ॥२॥
आतांसावधाऐकावें ॥ विधीनेंआणिलेंतीर्थेबरवें ॥ त्यातीर्थाचेपवित्रनावें ॥ शंकरवरिष्टासांगत ॥३॥
गंगायमुनासरस्वती ॥ विधीनेंस्मरतांचनिश्चिती ॥ आल्याधांवोनीपर्वतीं ॥ पश्चिमाभिमुखीतेधवा ॥४॥
एकत्रहौनीत्रीधारा ॥ देवीसन्मुखवाहतीसैरा ॥ जैसाप्रयागराजखरा ॥ संगमझालाएकत्र ॥५॥
गोदावरीनर्मदाकौमुदकी ॥ तापीमहेंद्रतापतीशरयुंगंडकी ॥ रेवापयोष्णीकर्मनाशिकी ॥ विपाशाशतद्रुबाहुदा ॥६॥
शोणभद्रफल्गुवेत्रवती ॥ गोमतीविंध्यतनयापार्वती ॥ वरूणाकृष्णावेण्याकुमुद्वती ॥ सावित्रीगायीत्रीतिलोत्तमा ॥७॥
भीमरथीशुषुम्नीचर्मण्वती ॥ तुंगभुद्रा कावेरीतपती ॥ मलापहारिणीभोगावती ॥ पातालगंगाइत्यादी ॥८॥
प्रभास्थानींकोलस्थानीं ॥ जींजींतीर्थेंअसतीमेदिनी ॥ मेरूमांदारपर्वतस्थानीं ॥ पारीयात्रपर्वतींजींतीर्थ ॥९॥
हिमाचलापृष्ठावरी ॥ जींतीथेंगंधमादनावरी ॥ विंध्यकुकुरसंह्यागिरीवरी ॥ मतंगपर्वतीजींतीर्थें ॥१०॥
त्रिकुटपर्वतमलयपर्वत ॥ महेंद्रादिइतरपर्वत ॥ इत्यादिस्थानीजींजींतीर्थें ॥ तीतींर्सवहीपातलीं ॥११॥
जींतीर्थेंपूर्वसागरगामिनी ॥ दक्षिणौत्तरसमुद्रगामिनी ॥ तैसेंचपश्चिमसमुद्रगामिनी ॥ पृथ्वीतळीचींजींतीर्थें ॥१२॥
विद्यमानतीर्थेअसती ॥ जींपाताळींतीर्थेराहतीं ॥ जींअसतीस्वर्गावरती ॥ गुप्तप्रगटसर्वही ॥१३॥
तितकींतीथेंएकत्रझाली ॥ एकमेकांतमिसळलीं ॥ कल्लोलासारखींभासलीं ॥ विधीआज्ञेनेंतेधवां ॥१४॥
पूर्वदिशेकडुननिघाली ॥ पश्चिमदिसेह्सीवाहूंलागलीं ॥ देवीच्यासन्मुखपातलीं ॥ तीर्थेंमंगलदायक ॥१५॥
ब्रह्मदेवेंअवलोकून ॥ कल्लोलनामठेविलेंजाण ॥ तीर्थेत्रैलोक्यपावन ॥ प्रसिद्धझालेंलोकांत ॥१६॥
आणिकएकौत्तमतीर्थ ॥ देवीच्याअग्रभागींस्थित ॥ भूमीखणोनीकुंडकरीत ॥ चतुराननजेंधवा ॥१७॥
क्षीराब्धिसर्वसागरासहित ॥ अमृताअणीसुराअद्‍भत ॥ विधीनेंस्थापिलेंत्याकुंडांत ॥ अमृतकुंडत्यासीम्हणती ॥१८॥
तेंअमृतकुंडतीर्थ ॥ परमपुज्यत्रैलोक्यांत ॥ परममंगलादायकनिश्चित ॥ दर्शनस्पर्शनस्नानानें ॥१९॥
वरिष्टम्हणेकल्लोलतीर्थ ॥ याचामहिमासविस्तृत ॥ सांगावाजेत्यातीर्थात ॥ स्नानकरितीप्राणीजे ॥२०॥
त्यासीफलकायप्राप्तहोत ॥ स्नानदानक्रियासमस्त ॥ कैशाकराव्यानिश्चित ॥ हेंमीजाणुइच्छितों ॥२१॥
सांगाकृपाकरोनीदेवा ॥ शिवम्हणेप्रश्नकेला ॥ तरीमीसांगतोंऐकावा ॥ महिमाकल्लोलतीर्थाचा ॥२२॥
जयाचेंमहात्म्याइकतांश्रवणीं ॥ सुखदेतप्राणियांलागुनी ॥ ज्याच्यास्मरणमात्रेंकरूनी ॥ सर्वपातकेंनिरसतीं ॥२३॥
किंचितसूर्योदयींजाण ॥ यातीर्थातकराविस्नान ॥ जरीमहापातकीदारूण ॥ होयपावकतात्काळ ॥२४॥
स्वइच्छाकेलाब्राह्मघात ॥ जोकासुरपानकरीत ॥ गुरुपत्‍नीसझालारत ॥ सुवर्णचोरिलेंब्राह्मणचें ॥२५॥
महापातकीचारबोलिले ॥ यांचासंगतीतो पांचवागणिले ॥ ऐसेपंचमहापातकीझाले ॥ यमयातनेसीभोगावया ॥२६॥
कल्लोळतीर्थींस्नानकरिती ॥ तात्काळपातकांपासूनीसुटती ॥ येथेंसंशयनधरीचित्तीं ॥ अणुमात्रहिवरिष्टा ॥२७॥
गोवधादिपापेंदारूण ॥ संकलीकर्णमालिनीकर्णा ॥ अपात्रीकरणजातीभ्रंशकरण ॥ बुद्धिपूर्वकलेलींअसती ॥२८॥
कल्लोलतीर्थजलदर्शन ॥ आचमनस्नानकेलीयाजाण ॥ सर्वपातकेंजवळतीदारुण ॥ प्रदीप्तअग्नीततृणजैंसे ॥२९॥
अगभ्यागमनाभक्ष्यण ॥ अस्पर्शस्पर्शावाच्याभाषण ॥ अनेकविधपातकेंकठिण ॥ कल्लोलदर्शनेंजळताती ॥३०॥
मकारस्थरविमाघमासीं ॥ प्रयागींत्रिवेणीसगमासी ॥ मासएककेलेंस्नानसी ॥ ब्रह्माचर्यव्रतयुक्त ॥३१॥
त्याचेंजेंपुण्यफळ ॥ स्वर्गीजाऊनीरहिलाचळ ॥ तैसेंचयेथेंस्नानाचेंफळ ॥ प्राप्तहोयमाघमासीं ॥३२॥
काशींक्षेत्रींमणिकर्णिकातीर्थी ॥ माध्यान्हींस्नानेंजेकरिती ॥ विश्वेश्वरासीपुजिती ॥ विधीयुक्तउपचारें ॥३३॥
होईलजीत्यासीफलप्राप्ती ॥ तीचयेथेंहोयनिश्चिती ॥ स्नानकरोनीकल्लोलतिथी ॥ जगदंबेसीपूजिता ॥३४॥
जीत्रिंबकजटोद्भुता ॥ गौतमीगंगामहसमर्था ॥ सिंव्हरशीसीगुरुअसता ॥ यात्रेसजातीजेनर ॥३५॥
गौतमीचेंस्नानपानकरिती ॥ देवपितरासीयजिती ॥ ब्राह्मणसीदानेंदेती ॥ नानाविधभक्तिनें ॥३६॥
त्र्यंबकाचेंकरितांपूजना ॥ ब्राह्मगिरीसीप्रदक्षणा ॥ जेंफलप्राप्तहोयजाणा ॥ तेंसर्वहीफलेंयेथें ॥३७॥
कल्लोलजलस्पर्शितां ॥ प्राप्तहोयतत्वता ॥ नाहींसंशययाअर्था ॥ सर्वपातकेंनासती ॥३८॥
उप्तातव्याधीविघ्नेंअनेक ॥ दिव्यभोगभोगअतरिक्षयेक ॥ तेसर्वनाशपावतीदेख ॥ कल्लेलतीर्थस्नानानें ॥३९॥
जेरोगासतीअनिवार ॥ दद्रुयामाक्षयापस्मार ॥ चर्चिकाएकाहिकज्वर ॥ द्वयाहित्रियाहिकचातुर्थिक ॥४०॥
पाक्षिकमासिकसीतोष्णज्वर ॥ तैसेअनेकैतरज्वर ॥ कोष्टाअसंख्यपीडाकर ॥ अश्मरीआदिकरोनी ॥४१॥
प्रमेहमुत्रकूच्छ्ररोग ॥ दद्रुभंडलवातरोग ॥ शिरोरोगकटहीरोग ॥ मुखरोगकर्णरोगादि ॥४२॥
नाशिकाअक्षिपभवरोग ॥ बाहुकर्पूरहस्तरोग ॥ कंठरोगस्तनरोग ॥ स्फोटहृदरोगईत्यादि ॥४३॥
अंतररोगजठशूळ ॥ नाभिशूळपार्श्वशूळ ॥ गुदशूळलिंगशूळ ॥ पादशूळईत्यादि ॥४४॥
जानूस्थितरोगनखरोग ॥ चर्मस्थितरोगजिव्हारोग ॥ पृष्ठस्थितरोगभगरोग ॥ अतिसारादिअनेक ॥४५॥
बधिरत्वदिवांधन्व ॥ मृकत्वाआणिपांगुलत्व ॥ क्षतेंअनेकदुःखबहुत्व ॥ लिंगव्रणकर्णव्रणादि ॥४६॥
तींतींसर्वनाशपावती ॥ स्नानकेल्याकल्लोलतीर्थी ॥ स्नानकरोनीदेवीसीनमिती ॥ आरोग्यहोतीपांचदिवसा ॥४७॥
क्रूरगृहप्रेतगृह ॥ तैसेवैनायकगृह ॥ मुखमंदलिकसंधिगृह ॥ वातगृह इत्यादी ॥४८॥
कूंष्मांडभैरवविकृतमुख ॥ यक्षभूतप्रेतपिशाच्च्यक ॥ शांकिणीडांकिणीप्राणीपीडक ॥ खेतीआदिकरोनी ॥४९॥
मनुष्यदेहांतव्यापुनीरहती ॥ कर्मानुबंधेपीडाकरिती ॥ तेतेसर्वहीनिघूनीजाती ॥ सुर्योदयीतमजैसें ॥५०॥
यमुनापर्वतींकल्लोलतीर्थ ॥ जगदंबेचेआलेंसमक्ष ॥ पाहताचपळतीत्वरित ॥ सिंहासपाहुनगजजैसे ॥५१॥
कल्लोलतीर्थीस्नानकरून ॥ मूर्खत्वजाड्यत्वजायनिघोन ॥ बुद्धिवानगुणसंपन्न ॥ विद्वानधनवानहोतसे ॥५२॥
दरिद्रदोषदुषितजाण ॥ जोनरकल्लोलतीर्थास्नान ॥ करीपश्चिमाभिमुखहोउन ॥ दरिद्रत्याचेंजातसे ॥५३॥
इंद्रासमान भाग्यवंत ॥ माझ्याअनुग्रहेंनिश्चित ॥ शिवम्हणेअन्यत्रत्रीथैंबहुत ॥ परिकल्लोलसमनसेची ॥५४॥
कोणीतीर्थेंऐसीआहेत ॥ पंधरादिवसपर्यंत ॥ सेवाकरावीअत्यंत ॥ मगसेवानुरूपफलदेती ॥५५॥
कोठेंएकमाससेवेकरून ॥ दोमासींकोठेंफळजाण ॥ षण्मासानंतरफलदेआपण ॥ वर्षानंतरफलकोठें ॥५६॥
तैसेंनोव्हेकल्लोलतीर्थ ॥ स्नानमात्रेमुक्तकरित ॥ याचेगुणवर्णावयासमर्थ ॥ विधीगुरुमीहीनसेंची ॥५७॥
आणिकजेश्रवणकरवायाची ॥ इच्छाअसेतुजलागींसाची ॥ सांगेनमीकथातेची ॥ परमशक्ततृंम्हणोनी ॥५८॥
आतांवरिष्ट ब्राह्मणाअपण ॥ शंकरासीकरिलप्रश्न ॥ उतराध्यायींनिरोपण ॥ सविस्तरतेहोईल ॥५९॥
म्हणेपांडुरंगजनार्दन ॥ यथामतीकरीनव्याख्यान ॥ देशभाषेंततुम्हीसज्जन ॥ श्रवणकराप्रीतीनें ॥६०॥
इतिश्रीस्कंदपुराणेसह्याद्रिखंडे ॥ तुरजामहात्म्ये शंकरवरिष्टसंवादे ॥ दशमोध्यायः ॥१०॥
श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥