1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (22:32 IST)

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

अनाथांची माय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 73 व्या वर्षी पुण्यात आज संध्याकाळी गॅलेक्झी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ताईंचे महिन्याभरापूर्वी हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ताईंनी  हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांना पदमश्री पुरस्काराने 2021 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. त्यांना डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तसेच महाराष्ट शासनाकडून अहिल्याबाई होळकर सन्मानाने भूषिले होते. त्यांचा निधनाने हजारो मुळे पोरकी झाली आहे. त्यांची माय त्यांना सोडून काळाच्या परद्या आड गेली आहे. त्यांच्या निधनाची बातमी मिळतातच रुग्णालयाच्या बाहेर गर्दी होत आहे. 
ताईंनी अनाथ मुलांसाठी पुण्यात पुरंदर तालुक्यात ममता बालसदन संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी अनाथ मुलांच्या शिक्षणाची सर्व जबादारी सांभाळली होती. त्या अनाथ मुलांची आई होत्या.