बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (08:26 IST)

‘कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांचे विशेष पथक नेमले’

Maharashtra Police
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना घडू नये यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली. पुण्यातील एसआरपीएफ,ग्रुप, रामटेकडी येथे ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
 
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गॅंगकडून दहशत माजवल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली असली. तरी अद्याप ही हातात कोयते नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच काम काही जण करत असल्याचे समोर आले आहे. 
Edited by: Ratnadeep Ranshoor