सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (08:12 IST)

मुलाच्या घरी आलेल्या आईचा दुर्दैवी मृत्यू, कपडे वाळत घालताना 8 व्या मजल्यावरुन पडली महिला

मुलाकडे राहायला आलेल्या आईचा इमारतीच्या 8 मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना पुण्यात (Pune News) घडली आहे.मृत महिला घराच्या गॅलरीत कपडे वाळू घालत असताना 50 वर्षाच्या महिलेचा तोल गेला. यामध्ये खालीपडून जखमी झालेल्या महिलेचा उपचापुर्वीच मृत्यू झाला. ही घटना पुण्यातीलआंबेगावातील एका नामांकित सोसायटीत घडली. केसरीदेवी हरिजी सिंग (वय-50) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
केसरीदेवी सिंग या पुण्यातील आंबेगाव खुर्द मधील दत्तनगर भागातील बहुमजली लेकवुड या नामांकित सोसायटीत  मुलाकडे रहायला आल्या होत्या.सिंग कुटुंबीय हे मुळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.
 
केसरदेवी या पुण्यात त्यांच्या मुलाचे लेकवुड सोसायटीत आठव्या मजल्यावर घर आहे.त्यांचा मुलगा आणि सून पुण्यात नोकरी करतात.त्यामुळे त्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी आल्या  होत्या.मंगळवारी  सकाळी सातच्या सुमारास त्या कपडे वाळू घालण्यासाठी गॅलरीत गेल्या होत्या.मात्र, कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरुन खाली कोसळल्या.
 
सोसायटीमधील नागरिकांनी केसरी देवी यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात  दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.रुग्णालयाने या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली.