सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (12:47 IST)

आधी मुलीला गळफास, मग पती-पत्नीनं आत्महत्या केली

अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आधी 10 वर्षांच्या मुलीला गळफास देऊन नंतर पती-पत्नीने गळफास लावून घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना चिठ्ठीही सापडली आहे. आर्थिक विवंचेनेतून ही घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे. 
 
केडगावमधील मोहिनीनगर भागात राहणारे व्यावसायिक संदीप दिनकर फाटक (वय ४५), किरण संदीप फाटक (वय ३२) व मैथिली संदीप फाटक (वय १०) अशी मृतकांची नावे आहेत. सकाळी शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले आणि घटना उडकीस आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, फाटक गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते आणि त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रात्री फाटक कुटुंबाचे आपल्या नातेवाईकांशी फोनवर बोलणे देखील झाले होते. मात्र सकाळी बराच काळ त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेजार्‍यांच्या लक्षात हा प्रकार आला आणि नंतर तेथेच राहत असलेल्या फाटकांच्या सासुरवाडीच्या लोकांनी जाऊन बघितल्यावर तिघांनी गळफास घेतल्याचे कळून आले.
 
पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.