बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (18:45 IST)

मलासन योग : बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास असल्यास हे आसन करा

अनिरुद्ध जोशी
 
योग आसन मलासन हे करायला खूप सोपं आहे. दररोज प्रत्येक व्यक्ती हे आसन करतोच.परंतु ह्याला योगाच्या विधीने केले तर हे फायदेशीर असू शकतं.ह्याला बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासातच आराम होत नाही तर ह्याचे इतर फायदे देखील आहे. चला तर मग जाणून घेऊ या मलासन करण्याची विधी आणि त्याचे फायदे.
 
मल+आसन म्हणजे मल किंवा विष्टा काढताना ज्या अवस्थेत बसतो त्याला मलासन असे म्हणतात.या आसनाची एक आणखी पद्धत आहे, परंतु इथे सामान्य पद्धतीची ओळख आहे. शौचालयात जाण्यापासून दिवसभर काम करण्यासाठी आपण खुर्चीवर बसतोच.ज्यामुळे आपली कंबर आणि  कंबरेच्या खालील भागाच्या स्नायूंचा व्यायाम अजिबात होत नाही. आपली दिनचर्या अशीच असेल तर सकाळी उठल्यावर किमान दहा मिनिटे मलासन मध्ये बसल्यावर फायदा होईल.
 
कृती - दोन्ही पाय दुमडून विष्टा काढण्याच्या स्थितीत बसा. नंतर उजव्या हाताच्या काखेला उजव्या आणि डाव्या हाताच्या काखेला डाव्या गुडघ्यावर टेकवून दोन्ही हात नमस्कारच्या मुद्रेत जोडून घ्या. काही वेळ अशा स्थितीत बसून पुन्हा सामान्य स्थितीत बसा.