रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (10:39 IST)

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीवरून पदाधिकाऱ्यांना धमक्या

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीबद्दल साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारणारे फोन केले जात आहेत. फादर दिब्रिटो यांची निवड रद्द करावी अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीच पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
 
मंगळवारपासून जाब विचारणारे फोन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना येऊ लागल्याचं साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं आहे. काही लोकांनी बघून घेऊ अशी भाषा चढ्य़ा आवाजात वापरल्याचंही त्यांनी सांगितलं. तूर्तास अशा धमक्यांबद्ल तक्रार करणार नसल्याचे पाटील यांनी सांगितलं आहे.