हे गजानना गणराया, आगमन तुझं होणार
हे गजानना गणराया, आगमन तुझं होणार,
आनंदाच्या डोहात डुंबून मी जाणार,
आशिष तुझा करील सर्व सुफळ संपन्न,
जाईल निघून वाईट काळ, येतील दिवस छान,
तुझी नजर आहे सर्वत्र ,भक्तांवर, कृपा होईल,
न येवो संकट कुणावर, असेल तर ते जाईल.
दे विद्येचे दान मज, करावं बुद्धिमान,
करवून घ्यावी तव सेवा, देईन सर्वास मान,
दुखवू नको कुणास मजकडून, द्यावी शांती मम चित्ता,
हे विघ्नेश्वर देईल मोदक तुजला, यावं लवकर आता!
..अश्विनी थत्ते.