शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (14:28 IST)

हिवाळ्यात अंघोळ केल्यावर हे लावा, लोण्यासारखी मऊ त्वचा मिळवा

आपल्याला हे माहितीच आहे की हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. वारंवार क्रीम आणि लोशन लावण्याचा देखील काहीच परिणाम होत नाही. म्हणून इथे आपल्याला सांगत आहो नैसर्गिक बॉडी लोशन बद्दल. याचे आपल्याला चांगले परिणाम दिसून येतील.
 
* बॉडी बटर - 
आपण सर्व हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करतो, हिवाळ्यात आपण गरम पाण्याने अंघोळ केल्यावर आपली त्वचा कोरडी होते. गरम पाणी आपल्या त्वचेमधील सर्व मॉइश्चरायझर काढून घेतं. जसं-जसं हिवाळा जवळ येतो आपली त्वचा काळपटते आणि टाचांना भेगा पडू लागतात. 

हिवाळ्यात आपली त्वचा मऊ ठेवण्यासाठी आपण बऱ्याच वेळा बॉडी-लोशन आणि मॉइश्चरायझर क्रीम लावत असतो, पण त्याचे प्रभाव काही तासापर्यंतच असतात. बरेच लोक बाजारपेठेतून बॉडी-बटर देखील विकत घेऊन येतात, जे खूप महाग असतात. अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास काही नैसर्गिक वस्तुंना वापरून बॉडी-बटर घरीच बनवू शकता. आपल्याला हे लावल्यावर पुन्हा-पुन्हा काहीच लावण्याची गरज भासणार नाही. हे तेवढेच क्रिमी आणि मॉइश्चरायझर युक्त असतात, जे बाहेरून आणलेले उत्पादन असत. चला तर मग हे कसे बनवायचे जाणून घेऊ या.

साहित्य -
साजूक तूप 5 चमचे, एरंडेल तेल/ऑलिव्ह तेल/ बदाम तेल 2 चमचे, व्हॅसलिन पेट्रोलियम जेली 1 ते 2 चमचे, ग्लिसरीन 2 चमचे, कोरफड जेल 2 ते 3  चमचे, कोको पावडर 2 चमचे.
 
कृती - 
साजूक तूप, व्हॅसलिन, ग्लिसरीन आणि कोरफड जेल एका भांड्यात एकत्र करून चमच्याने मिसळा. हे सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिसळल्यावर या मध्ये कोको पावडर घाला. चांगले मिसळा. पेस्ट तयार झाल्यावर काचेच्या बाटलीत ठेवून वापरावं. 
 
* बॉडी बटरचे फायदे - 
हे बॉडी बटर दिवसातून एकदाच वापरावे. याचा वापर केल्यानं आपली त्वचा हिवाळ्यात मऊ आणि कोवळी होईल. जर आपले कोपरं, गुडघे आणि टाचा काळपट होत असल्यास, तर हे लोशन त्यांच्या रंग देखील उजळेल. आपण हे डोळ्याच्या खाली अंडर आय क्रीम म्हणून देखील वापरू शकता. हे बॉडी-बटर आपल्यासाठी लिपबाम प्रमाणे देखील कार्य करेल आणि त्यांना हायड्रेट ठेवण्यास मदत करेल.
 
* कोको पावडर - 
कोको बीन्सला वाटून बनवल्या जाणाऱ्या पूडला कोको पावडर म्हणतात. हे त्वचेला उजळ करणारे एजंट आहे जे टॅनिग काढून टाकत. आणि दडलेल्या रंगाला उजळतं. या शिवाय या मध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात जे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांना काढून टाकतं.
 
* साजूक तूप - 
तूप लावल्याने त्वचेवर एक संरक्षणात्मक परत तयार होते ज्यामुळे आपली त्वचा कोरडी होण्यापासून वाचते. या मध्ये व्हिटॅमिन ई आढळत, जे सुरकुत्या आणि फाईन लाइन्स ला चेहऱ्यासह हात-पायांपासून दूर ठेवत.
 
* व्हॅसलिन पेट्रोलियम जेली -
हिवाळ्यात हे त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेते. हे त्वचेला रुक्ष होण्यापासून वाचवते आणि त्याला मऊ आणि कोवळी ठेवते. आपली इच्छा असल्यास हे बॉडी बटर आपण डोळ्याच्या खाली आणि फाटलेल्या ओठांवर रात्री झोपण्याचा पूर्वी लावू शकता. 
 
* कोरफड जेल - 
हिवाळ्यात कोरफड आपल्या त्वचेचे पीएच ची पातळी समतोल करून ठेवण्याचं काम करतं. त्वचेला कोरड पडल्यामुळे होणारी खाज आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी हे क्रीममध्ये वापरात. या मध्ये अँटिसेप्टिक, अँटी इंफ्लेमेट्री आणि अँटीएजिंगचे गुणधर्म असतात, जे आपल्या त्वचेला अनेक संसर्गापासून वाचवतात.