शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (13:14 IST)

या 7 बँकांमध्ये खाते असणार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी, १ एप्रिलपासून बदलणार IFSC, या प्रकारे का बदल

१ एप्रिलपासून अनेक बँकांचे अनेक बँकांची जुने चेकबुक आणि आयएफएससी कोड निष्क्रीय होणार आहेत. चेकबुक, पासबुक आणि आयएफएससी कोडमध्ये मोठे बदल होणार असून यात या सात बँकांचे समावेश आहेत. ग्राहकांना आपले नवीन कोड जाणून घेणे गरजेचे आहे. कोड ठाऊक नसल्यास व्यवहार करताना अडचणींना सामोरा जावं लागू शकतं.
 
देना बँक
विजया बँक
कॉर्पोरेशन बँक
आंध्रा बँक
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
यूनायटेड बँक 
इलाहाबाद बँक
 
या सात बँकेच्या ग्राहकांना 1 एप्रिलपासून होणाऱ्या या बदलांचा फटका बसू नये म्हणून ग्राहकांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क करुन नव्या चेकबुक आणि आयएफएससी कोडसंदर्भात माहिती घ्यावी.
 
३१ मार्च २०२१ पर्यंत जुन्या IFSC कोडवरुन व्यवहार सुरु राहणार आहे मात्र 1 एप्रिलपासून नवीन कोडची गरज भासेल. 
 
काय आहे IFSC कोड 
ऑनलाइन व्यवहार करताना खाते क्रमांकाबरोबरच बँकेचा IFSC कोडही आवश्यक असतो. इंडियन फाइनॅनशियल सिस्टीम कोड म्हणजेच IFSC कोड हा प्रत्येक शाखेला देण्यात आलेला विशेष क्रमांक असतो.