शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 8 एप्रिल 2020 (15:46 IST)

सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ

लॉकडाऊनमुळे सोन्या-चांदीची दुकाने बंद असली तरी सोन्या-चांदीच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असून सोन्याने आता ४४ हजार ७०० रुपये तोळा हा भावाचा विक्रम केला आहे. चांदीच्या भावातही प्रति किलो २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तो ४३ हजार ३०० रुपये झाला आहे.

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक देशांमधील व्यवहार बंद असल्याने शेअर बाजार कोसळले आहेत. यामुळे शेअर बाजारातील काही गुंतवणूकदार सोन्या-चांदीच्या गुंतवणूकीकडे वळल्याने त्यांच्या भावात सतत वाढ होत आहे. त्यामुळे सोन्याचा भाव आता ४४ हजार ७२४ रुपये तोळा झाला आहे, तर चांदी ४३ हजार ३४५ रुपये किलो झाली आहे.