1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:30 IST)

शेन वॉर्नवर मारहाण केल्याचा आरोप

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नने मारहाण केल्याचा आरोप वॅलेरी फॉक्स या पॉर्न स्टारने केला आहे. याप्रकरणी फॉक्सने शेन वॉर्नविरोधात तक्रारही दाखल केली आहे.फॉक्सने जखमा झालेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत शेन वॉर्नवर मारहाण केल्याचा आरोप केला. ‘’तुम्ही लोकप्रिय असाल, मात्र कोणत्याही महिलेला मारहाण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही’’, असं फॉक्सने ट्विटरवर म्हटलं आहे.फॉक्सने शेअर केलेल्या फोटोंमध्ये शेन वॉर्नचं नाव लिहिलेलं नाही. शेन वॉर्नवर लावलेले आरोप सिद्ध झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते.