शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (19:40 IST)

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो

आपण निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टीची काळजी घेत असतो. जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं हे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, जेवण केल्यावर लगेच पाणी पिऊ नये. बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. आपण देखील असे करत असाल तर आजच ही सवय थांबवा. अन्यथा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कसं काय जाणून घेऊ या.
 
* पाचक प्रणाली योग्यरीत्या काम करत नाही-
जेवल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करू नये. या मुळे पचन तंत्र योग्यरीत्या काम करत नाही आणि अनेक समस्यांना सामोरी जावे लागते.  
 
* शरीराचे तापमान बदलते- 
जेवणानंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान बदलू शकते. या मुळे अन्न पचनासाठी लागणाऱ्या तापमानात देखील बदल होऊ शकतो.  
 
* रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते- 
जेवणानंतर पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. या मुळे मधुमेहाचा धोका होऊ शकतो. 
 
* गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो-
जेवण केल्यावर ताबडतोब पाणी प्यायल्याने गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो. या समस्याला दूर करण्यासाठी जेवण्याच्या नंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
 
* पाणी कधी प्यावे-
जेवण केल्याच्या 30 मिनिटा नंतर पाणी पिऊ शकता. परंतु जेवण केल्याच्या 30 मिनिटे पाणी अजिबात पिऊ नका. असं करणे टाळावे.