गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (15:30 IST)

बोध कथा : राजा आणि चोर

फार पूर्वीची गोष्ट आहे, एका राजाच्या राज्यात चोरी झाली होती आणि त्याला असं काही घडल्याची माहिती नव्हती. काही दिवसांनी राजाला समजले की आपल्या राज्यात कोणीतरी ही चोरी केली आहे. राजाला खूप राग आला आणि तो म्हणाला की आज जर तो चोर मला सापडला तर मी त्याला ठार मारेन. पण राजाचा मंत्री खूप हुशार होता, तो राजाला म्हणाला, राजन आपण रागावू नका, हा क्षण चिडण्याचा नाही तर बुद्धीने काम घेण्याचा आहे. तरच काही करता येऊ  शकतं. राजाला मंत्र्याला काय म्हणायचं आहे हे समजले नाही ते मंत्रीला म्हणाले, आपल्याला काय म्हणायचे आहे, तेव्हा मंत्री म्हणाले, मला काही लोकांवर संशय आहे. पण त्यांना पकडण्यासाठी मला आपल्या आदेशाची गरज आहे. राजा म्हणाले, आपल्याला जे करायचं ते करा, पण त्या चोराला पकडून माझ्यापुढे आणा. मंत्री म्हणाले, मला दहा जणांवर संशय आहे, मी त्यांना आपल्या पुढे आणतो, पण चोर कोण, हे आपल्याला  शोधायचे आहे. राजा म्हणाले, बरं, उद्या सकाळपर्यंत आपल्याला ज्यांच्यावर संशय आहे त्यांना माझ्यापुढे आणा.आता तर रात्र झाली आहे, पण राजाला झोप येत नव्हती आणि काय करावे हे देखील समजत नव्हते. थोडा वेळ विचार केल्यावर राजाच्या मनात एक विचार आला आणि तो आनंदाने झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी त्या दहा लोकांना राजासमोर आणण्यात आले.

राजाने दहाकाठ्या मागवल्या आणि  प्रत्येकी दहा जणांना एक -एक काठी दिली आणि सांगितले की आपल्यापैकी ज्याने चोरी केली आहे , त्याची काठी उद्या आपोआप दोन इंच लहान होईल. राजाचे हे बोलणे ऐकून सर्वजण घाबरून गेले, तेव्हा राजा म्हणाले, आता आपण आपल्या घरी जा आणि उद्या सकाळी पुन्हा काठी घेऊन या. हे सर्व पाहून राजाचा मंत्र्याला खूप राग आला आणि ते म्हणाले, महाराज आपण हे काय म्हणताय ही काठी कशी काय कमी होईल. यात काही जादू नाही, हे ऐकून राजा हसला आणि म्हणाला, मंत्री महोदय, आपण हे उद्या प्रत्यक्ष पहा आपल्याला सर्वकाही समजेल.
 
सर्वजण आपापल्या घरी जाऊन झोपले, पण चोराला काही झोप येत नव्हती, तो वारंवार आपल्या काठी कडे बघत होता. की कधी ही काठी मोठी होणार. मध्यरात्र झाली होती तरीही काठी कमी झाली नाही, त्याने विचार केला की आपण जर ही काठी दोन इंच कापून दिली तर सकाळी ती पूर्वाकारात येईलच त्याला खूप झोप येत होती.त्याने ती काठी कापली आणि झोपला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वजण आपल्या काठ्या घेऊन राजाच्या दरबारात पोहोचले तेव्हा राजाने सर्वांना आपआपल्या काठ्या आपल्या समोर ठेवण्यास सांगितले, त्यानंतर त्या चोराने देखील आपली कापलेली काठी समोर केली तर काय ती काठी इतर काठ्यांपेक्षा लहान होती. राजाला लगेच लक्षात आले की हाच चोर आहे. यानंतर राजाने त्याला कठोर शिक्षा केली, राजाचे हे असे न्याय पाहून मंत्र्याला खूप आनंद झाला.
 
बोध : कोणाची फसगत करून आपण पुढे जाऊ शकत नाही ,चोरी करणाऱ्याची चोरी नेहमी पकडली जाते