कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

Last Modified शुक्रवार, 5 मार्च 2021 (10:00 IST)
आता होळीच्या पूर्वी घरोघरी चिप्स, पापड्या बनविण्यासाठीची लगबग सुरू असते. घरी साबुदाण्याच्या पापड्या करताना काही गोष्टींना लक्षात ठेवा. जेणे करून पापड्या चांगल्या बनतील चला तर मग जाणून घेऊ या काय आहे टिप्स.

* साबुदाण्याची निवड-
सध्या बाजारपेठेत साबुदाण्याचे बरेच प्रकार मिळतात.आपण लहान मोठे कोणत्याही आकाराच्या साबुदाण्याच्या पापड्या बनवू शकता. लक्षात ठेवा की साबुदाणा जेवढा पारदर्शक असेल साबुदाण्याच्या पापड्या चांगल्या बनतील.

* साबुदाणा स्वच्छ कसा कराल -
काही लोक साबुदाणा शिजविण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ करतात. असं करू नये.या मुळे साबुदाण्यातील पावडर देखील पाण्याने धुतले जाईल आणि पापड्या चांगल्या बनणार नाही. साबुदाणा निवडून पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आपण अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे तर त्यामध्ये एक लीटर पाणी घाला. या पेक्षा अधिक पाणी घालू नका.

* साबुदाणा शिजवायचा कसा-
रात्र भर साबुदाणा पाण्यात भिजत पडू द्या त्याच पाण्यासह सकाळी साबुदाणा गॅसवर शिजवून घ्या. गॅस मंद ठेवा साबुदाणा ढवळत राहा. असं केल्याने त्यामध्ये गाठी पडत नाही, साबुदाणा देखील जळत नाही आणि भांड्याला चिकटत देखील नाही.

* घोळ कसा तयार करावा-
साबुदाण्याचे घोळ जास्त पातळ नसावे आणि घट्ट देखील नसावे. पॉलिथिनवर टाकल्यावर ते पसरू नये. घोळ घट्ट झाले असल्यास त्यामध्ये गरम पाणी घालून रवीने घुसळून घ्या. घोळ पातळ झाले असल्यास त्याला गॅसवर शिजवावे लागणार. साबुदाण्याच्या घोळात मीठ कमी घाला नाही तर हे खारट होऊ शकतात. आपण या मध्ये जिरे देखील घालू शकता.

* वाळवायचे कसे-
साबुदाण्याच्या घोळ तयार झाल्यावर पॉलिथिनवर गोलगोल पसरवून घ्या. घोळ पॉलिथिनवर पसरविण्यापूर्वी पॉलिथिनवर तेल लावा जेणेकरून घोळ चिटकून बसणार नाही. 3 दिवस कडक उन्हात वाळवा. पापड्या पॉलिथिन वरून बळजबरीने काढून घेऊ नका. नाही तर त्या तुटतील. संपूर्ण वाळल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवा.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

हृदयामध्ये राम - सीता

हृदयामध्ये राम - सीता
रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर श्रीरामाने त्या सर्वांना भेटवस्तू दिल्या ज्यांनी युद्धात ...

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा
सहनशील व धैर्यवान सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या ...

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल
मुलांनी प्रगती करावी अशी इच्छा सर्व पालकांना असते अशात त्याच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष ...

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची
कोरोनामुळे बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. लग्नसोहळे कमी खर्चात आणि मोजक्या पाहुण्यांच्या ...

दही कबाब रेसिपी

दही कबाब रेसिपी
हे तयार करण्यासाठी सर्वात आधी दह्याला कपड्यात बांधून पाणी काढून घ्या. नंतर दही 8 ...