ताजे मासे कसे ओळखावे? बाजारातून मासे आणताना ही काळजी घ्या

fish
Last Modified मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (16:39 IST)
ताजे मासे ओळखणे देखील एक कला आहे आणि मासा विकत घेताना काळजी घेणे आवश्यक आाहे. मासे निवडून कापून आणि काटे काढून आणणे देखील महत्त्वाचं काम असतं. जाणून घ्या मासे कसे निवडावे-

ताजे मासे दिसायला तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात.
मासा कडक आणि ताठ असावा.
मरगळलेले मासे घेऊ नये.
ताज्या माशांना किंचीत हिरमुस वास असला तरी घाण- कुजकट वास येत नाही.
ताज्या माश्याचे डोळे चकचकीत आणि पारदर्शक दिसतात. लालसर किंवा धुरकट पांढरे डोळे असेलेले मासे घेऊ नये.
ताज्या माशांच्या तुकड्यांवर पारदर्शक पांढऱ्या रंगाची झाक असते.
मोरी, मुशीसारखे मासे समोर कापून घ्यावे.
पापलेटच्या कल्ल्यातून पांढरा द्रव येत असल्यास ते ताजे समजावे.
बोबिल ताजे असताना तोंडाकडे केशरी, गुलाबी असावे.
शिळा मासा बोटाने दाब दिल्यावर खोलगट ठसा उमटतो. असा मासा घेऊ नये.
ताज्या माशाचे कल्ले जरा उघडून पाहिल्यास आतमधून बऱ्यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतील.
खेकडे घेताना काळसर रंगाचे, जिवंत आणि चालणारे घ्यावे.
खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबावी. जर पाठ कडक असेल तर खेकडे आतुन मांसाने भरलेले असतात. पाठ दबत असल्यास खेकडे आतून पोकळ असतात.
भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा हे मासे बोटांनी दाबून बघावे. घट्ट असल्यास घ्यावे.
माशांचे तोंड उघडून बघावे. आतमध्ये लालसर भाग दिसल्यास ते ताजे समजावे. काळसर रंग दिसल्यास ते शिळे किंवा खराब असे समजावे.
पापलेट घेताना डोळ्याखालचा भाग दाबून बघावा. त्यातुन पांढरं पाणी आले तर ते ताजे समाजवे आणि लाल पाणी आल्यास ते शिळे असतात हे समजावे.
पापलेट खराब होत आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.
शिंपले घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्या.
जिवंत आणि तोंडाची उघडझाप करणाऱ्या शिंपल्या घेणे योग्य.
तांबुस पांढर्‍या रंगाची आणि घट्ट सालीची करंदी ताजी असते.
तोंड उघडून बघितल्यास लालसर रंगाचे दिसणारे बांगडे ताजे असतात.
शिळ्या बांगड्यांना पिवळसर रंग येऊ लागतो आणि ते मऊ पडतात. त्यांना बोटांनी दाबल्यास खड्डा पडतो.
उघडलेले शिंपले शिळे असतात.
करली घेताना कोळीणीकडून तिरपी कापून घ्यावी त्यात काटे खूप असतात.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

पार्टनरशी भांडण सोडवल्यानंतरही या गोष्टी लक्षात ठेवा

पार्टनरशी भांडण सोडवल्यानंतरही या गोष्टी लक्षात ठेवा
जोडप्यांमध्ये अधूनमधून भांडणे होणे सामान्य आहे परंतु असे क्षुल्लक वाद लवकरच सोडवले ...

जर तुम्हाला ध्यान करण्यात समस्या असेल तर या नियमांचे पालन ...

जर तुम्हाला ध्यान करण्यात समस्या असेल तर या नियमांचे पालन करा, चांगले परिणाम मिळतील
चांगले जीवन जगण्यासाठी ध्यान अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ...

लोभी कुत्र्याची कथा

लोभी कुत्र्याची कथा
एका गावात एक कुत्रा राहत होता, जो खूप लोभी होता. गावातील इतर सर्व कुत्रे आणि इतर प्राणी ...

Kitchen Tips: रवा, मैदा आणि बेसन पीठ खराब होऊ नये यासाठी ...

Kitchen Tips: रवा, मैदा आणि बेसन पीठ खराब होऊ नये यासाठी सोप्या टिपा
मैदा, रवा आणि बेसनापासून बनवलेली डिश प्रत्येकाला आवडते. परंतु या गोष्टी दीर्घकाळ ...

घरी बसून या प्रकारे कमावू शकतात महिला

घरी बसून या प्रकारे कमावू शकतात महिला
आपण गृहिणी आहात, नोकरी करण्याची खूप इच्छा आहे, पण परिस्थिती अनुकूल नाही. अशा परिस्थितीत, ...