शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : गुरूवार, 16 जून 2022 (09:08 IST)

भजी कुरकुरीत होतील, बेसनाचं मिश्रण तयार करताना या टिप्स अमलात आणा

bhajiye
पावसाळी संध्याकाळ असो किंवा हिवाळ्याची सकाळ, चहासोबत बेसनाचे कुरकुरीत भजी सर्वांनाच आवडतात. जर तुम्ही कधी रस्त्यावरील गाडीतून किंवा चहाच्या हॉटेलमधून पकोडे खाल्ले असतील, तर तुमच्या लक्षात आले असेल की अशी चव अनकेदा घरी मिळत नाही. जर तुम्हालाही कुरकुरीत भजी आवडत असतील तर बेसन मिक्स करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. बेसन मिक्स करताना या काही टिप्स आहेत ज्याचा अवलंब केल्यास लोक तुमच्या पकोड्यांचे चाहते होतील. 
 
बऱ्याच वेळा पकोडे कढईतून काढल्यावर कुरकुरीत असतात, पण खाताना मऊ लागतात. यासाठी बेसन विरघळण्यापासून ते तळताना तेलाच्या तापमानापर्यंत काळजी घ्यावी लागेल.
 
भज्यांसाठी नेहमी बेसनाचे पीठ थंड पाण्यात मिसळावे. बेसन एका दिशेने ढवळावे आणि त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे की बेसन खूप पातळ असू नये आणि जास्त घट्ट असू नये.
 
पकोड्यांसाठी बेसन ढवळत असताना त्यात तांदूळ किंवा कॉर्न फ्लोअर घाला. यामुळे पकोडे कुरकुरीत होतील. तेल चांगले तापू द्या आणि नंतर पकोडे तळून घ्या. घाईघाईत भजी तळल्याने मऊ पडतात.
 
मिश्रश तयार करताना त्यात 8-10 थेंब गरम तेल टाका. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कांदा, बटाटा किंवा मिक्स्ड व्हेज पकोडे बनवत असाल तर त्यातील पाणी काढलेलं असावं. त्यासाठी आधी भाज्या चिरून त्यात मीठ टाका. जेव्हा तुम्ही पकोडे बनवायला लागता तेव्हा भाज्या पिळून घ्या आणि त्यात घाला.