शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Updated : गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (08:50 IST)

Dry Fruits Halwa चविष्ट ड्रायफ्रूट्स हलवा रेसिपी

Halwa Recip benefits
ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपण ड्रायफ्रूट्सचा वापर  करून अनेक खाद्य पदार्थ बनवू शकतो. आपण आज ड्रायफ्रूट्स चा हलवा बनविण्याची रेसिपी जाणून घेऊ या.दिवाळीसाठी हे खूप चांगले आणि नवीन पदार्थ असणार चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य -  
1/2 कप पिस्ता,(बारीक काप केलेले) 1/2 कप अक्रोड(बारीक काप केलेले ), 1 कप बदाम (बारीक काप केलेले), 1/4 चमचा वेलची पूड, 1 /2 कप खजूर(बारीक काप केलेले ) , दीड कप साखर, 1 कप पाणी, 1 कप साजूक तूप.
 
सर्वप्रथम एका कढईत मध्यम आंचेवर एका चमचा साजूक तूप घालून गरम करा. तूप वितळल्यावर त्यात पिस्ता घालून सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या. त्यात वेलचीपूड मिसळा आणि गॅस बंद करून बाजूला ठेवा. नंतर खजूर , पाणी आणि साखर घालून मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करून घ्या. त्यात शिल्लक असलेले तूप मिसळून घ्या.आता तापत असलेल्या कढईत खजुराची केलेली पेस्ट  घालून 5  ते 7 मिनिटे परतून घ्या ही पेस्ट घट्ट झाल्यावर गॅस मंद करून ढवळत राहा. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात बदाम, पिस्ता आणि अक्रोड घालून 4 ते 5 मिनिटे शिजवा. 
 
ड्राय फ्रुट्स हलवा तयार आहे. थंड झाल्यावर सर्व्ह करा.