Guava Halwa Recipe घरी तयार करा पेरुचा शिरा

Guava
Last Modified सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (12:39 IST)
हिवाळा सुरू झाला की प्रत्येक घरात गरमागरम शिरा खाण्याची पद्धत सुरू होते. गाजर, रवा, मैदा, मूग डाळ किंवा बेसन अशा हलव्याची चव तुम्ही नक्कीच चाखली असेल, पण पेरूचा शिरा कधी खाल्ला आहे का? पेरूचा शिरा वाचल्यानंतर तुम्हाला जरा आश्चर्य वाटत असेल पण एकदा तुम्ही हा हलवा चाखल्यानंतर तुमच्या आवडत्या मिठाईच्या यादीत त्याचा समावेश होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा पेरूचा चविष्ट हलवा.
पेरुचा शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य-
-पेरु- 4
-साखर- 1 कप
-वेलची- एक चतुर्थांश लहान चमचा
-बीटरूट - एक इंच तुकडा
-तुप- एक चतुर्थांश कप
-काजू- 2-3 टेबल स्पून (बारीक चिरलेले)
-बदाम- 2-3 टेबल स्पून (बारीक चिरलेले)
-दूध- अर्धा लीटर

कृती- पेरूचा हलवा बनवण्यासाठी आधी मावा घरीच तयार करा. यासाठी कढईत दूध उकळण्यासाठी ठेवा. दूध उकळत असताना, सुमारे 40 मिनिटे ढवळत राहा. दूध घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवा. तुमच्या हलव्याचा मावा तयार आहे. यानंतर, पेरू आणि बीटरूटचे मोठे तुकडे करा आणि अर्धा कप पाण्याने कुकरमध्ये एक शिटी येईपर्यंत थांबा. शिटी येताच गॅस बंद करा. थंड झाल्यावर कुकरमधून पेरू काढून मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या, पेरूच्या बिया काढून फेकून द्या.
आता गॅसवर एक पॅन ठेवा, त्यात 3 चमचे तूप घाला, चिरलेले ड्रायफ्रुट्स (काजू आणि बदाम) घाला आणि हलके तळून घ्या. ते तळल्यावर त्यात पेरूचा लगदा घाला आणि मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा. आता त्यात साखर घालून चांगले शिजवून घ्या. साखर नीट विरघळल्यावर त्यात खवा (मावा) टाका आणि नीट ढवळून पुन्हा शिजवा. 5 मिनिटे शिजवल्यानंतर त्यात वेलची पूड घाला आणि हलवा 2 ते 3 मिनिटे चांगला शिजवा. तुमचा चविष्ट पेरूचा हलवा तयार आहे. या हलव्याची खासियत म्हणजे हा हलवा आठवडाभर साठवता येतो.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

माव्याशिवाय बनवा स्वादिष्ट गाजर हलवा, जाणून घ्या सोपी

माव्याशिवाय बनवा स्वादिष्ट गाजर हलवा, जाणून घ्या सोपी रेसिपी
जर तुम्हाला हिवाळ्यात गरमागरम गाजराचा हलवा खायला मिळत असेल तर यापेक्षा चविष्ट अजून काय ...

बोध कथा :शरीर आणि मनावर नियंत्रण नसल्यास ज्ञान देखील

बोध कथा :शरीर आणि मनावर नियंत्रण नसल्यास ज्ञान देखील विषसमान
तसं तर भगवान गौतम बुद्ध आपल्या मग्न असायचे. ध्यानमध्ये असायचे आणि शांत राहून आपल्या ...

Genome Sequencing म्हणजे काय? कोरोना व्हायरसचं बदललेलं रूप ...

Genome Sequencing म्हणजे काय? कोरोना व्हायरसचं बदललेलं रूप शोधण्यासाठी त्याची किती मदत होते
कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल झालाय. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, 'प्रत्येक ...

शरीरासाठी फायदेशीर मनुकाचे पाणी, सेवन करण्याची योग्य पद्धत ...

शरीरासाठी फायदेशीर मनुकाचे पाणी, सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येक सुक्या मेवाचे स्वतःचे फायदे आहेत. काही ...

हिवाळ्यात, कोरडी आणि निर्जीव त्वचा परत ग्लोइंग करण्यासाठी ...

हिवाळ्यात, कोरडी आणि निर्जीव त्वचा परत ग्लोइंग करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा
हिवाळा सुरू झाला की आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. हिवाळ्यात थंड हवेमुळे आपली त्वचा ...