शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2019 (11:34 IST)

OnePlus 7 Pro च्या या खास वेरियंटची आज सेल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

भारतात OnePlus 7 Pro चे Almond कलर वेरियंटची विक्री आज अर्थात 14 जूनपासून सुरू होत आहे. वनप्लस 7 प्रो चे आलमंड ऍडिशन आज दुपारी 12 वाजता अमेजन इंडिया, OnePlus.in आणि वनप्लसच्या स्टोअरमधून खरेदी करू शकता. अलमंड कलर वेरियंट वनप्लस 7 प्रो चा शेवटचा वेरियंट आहे. याअगोदर वनप्लस 7 प्रो 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅमसोबत 256 जीबी स्टोरेज वेरियंटसोबत मिरर ग्रे आणि नीबूला ब्लु कलर वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. सांगायचे म्हणजे मिरर ग्रे कलर वेरियंट 12 जीबी रॅमसोबत मिळणार नाही, तसेच नीबूला ब्लु 6 जीबी रॅममध्ये नाही मिळणार आहे.
 
OnePlus 7 Pro Almond वेरियंटची किंमत
वनप्लस 7 प्रोच्या आलमंड कलर वेरियंटची किंमत 52,999 रुपये एवढी आहे आणि हा फोन फक्त 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये मिळेल. लाँचिंग ऑफर्सची गोष्ट केली तर तुम्ही एसबीआयच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डहून खरेदी करत असाल तर तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंत केशबॅक मिळेल.
 
OnePlus 7 Pro Almond चे स्पेसिफिकेशन
वनप्लस 7 प्रो आलमंडमध्ये एंड्रॉयड पाई 9.0 आधारित OxygenOS मिळेल. या फोनमध्ये क्वॉड एचडी रिझोल्यूशन (1440x3120 पिक्सल) मिळेल. तसेच 2 वर्षांपर्यंत  सॉफ्टवेयर अपडेट आणि 3 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळेल. वनप्लस 7 प्रो मध्ये 6.67 इंचेची फ्लुइड एमोलेड डिस्प्ले मिळेल ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5चे प्रोटेक्शन मिळेल. प्रोसेसरची गोष्ट केली तर वनप्लस 7 प्रो मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळेल ज्यात ग्राफिक्ससाठी  एड्रेनो 640 जीपीयू आणि 12 जीबीपर्यंत रॅम मिळेल. या फोनमध्ये 256 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल.
 
OnePlus 7 Pro Almond चा कॅमेरा
कॅमेरेची गोष्ट करायची झाली तर OnePlus 7 Proमध्ये रियर पॅनलवर 3 कॅमेरे आहे ज्यात एक 48 मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेंसर असणारा प्रायमरी कॅमेरा आहे. याचा अपर्चर f/1.6 आहे. तसेच कॅमेर्‍यासोबत ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन दोन्ही मिळतील. फोनमध्ये दुसरा कॅमेरा 16 मेगापिक्सलचा f/2.4 अपर्चर असणारा अल्ट्रा वाइड एंगल आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस आहे ज्याच्यासोबत 3x ऑप्टिकल झूम मिळेल. रिअर कॅमेर्‍यासोबत डुअल एलईडी फ्लॅश लाइट मिळेल आणि 4के व्हिडिओ रिकॉर्डिंगचे देखील विकल्प मिळेल. फ्रंट कॅमेर्‍याची गोष्ट केली तर यात 16 मेगापिक्सलचा पॉपअप सेल्फी कॅमेरा आहे ज्यात सोनी IMX471 सेंसर आहे. कंपनीने म्हटले आहे की 5 वर्षांपर्यंत कॅमेर्‍यात कुठलीही खराबी येणार नाही.
 
OnePlus 7 Pro Almond ची बॅटरी आणि कनेक्टिविटी
या फोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, NFC, GPS/A-GPS, यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये डॉल्बी ऍटम ऑडियो मिळेल. फोनचे वजन 206 ग्रॅम एवढे आहे आणि यात कूलिंगसाठी एक ट्यूब देण्यात आली आहे.