सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (15:14 IST)

बाप रे ! बस पेटली ! पुण्याहून दापोडीला जाणाऱ्या बस ने पेट घेतला, यात 20 ते 25 प्रवाशी होते, सर्व सुखरूप

पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये एका पीएमपीएमएल(PMPML) बस ने अचानक पेट घेतला. या वेळी बस मध्ये 20 ते 25 प्रवाशी होते. ही बस पुण्याहून दापोडीला येत होती. अचानक बस ने पेट घेतला. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

दापोडीच्या मुळा नदीच्या  पुलावर असताना चालकाला इंजिन मधून धूर येताना दिसला त्याने ताबडतोब वेळ ना गमावता प्रवाशांना बसच्या खाली उतरण्यास सांगितले नंतर आग भडकली आणि बसने पेट घेतला. त्यामुळे लोकांना 'द बर्निंग बस' चा थरार पाहायला मिळाला.

ताबडतोब अग्निशमन दलाचे बंब  घटनास्थळी दाखल झाले. परंतु जवानां पुढे मोठे आवाहन होते  की ही बस सीएनजी ने चालणारी असल्यामुळे आग गॅस च्या टाकी पर्यंत पोहोचता कामा न ये. त्यात जवानांना यश मिळाले आणि मोठं अनर्थ टळले . बस चालकाने प्रसंगावधानाने निर्णय घेऊन प्रवाशांचे प्राण वाचवले या साठी त्यांचे कौतुक होत आहे.