लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

aslam shekh
Last Modified मंगळवार, 13 एप्रिल 2021 (15:31 IST)
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य लॉकडाऊन करण्याच्या तयारीत ठाकरे सरकार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षिय नेत्यांशी चर्चा केली. तसंच, टास्क फोर्स, तज्ज्ञांशी चर्चा केली. राज्यात जवळपास लॉकडाऊन होणार हे निश्चित झालं आहे. मात्र, कधीपासून जाहीर होणार याबाबत काहीच स्पष्ट नाही आहे. दरम्यान, लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. कुणाशी चर्चा न करता लॉकडाऊन लावण्याची केंद्रानं केलेली चूक आम्ही करणार नाही, असं देखील अस्लम शेख म्हणाले.
सरकार कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करत आहे. पण कुठेही रुग्ण कमी झाल्याचं दिसत नसल्यामुळे लॉकडाऊनबाबतचा निर्णय सरकार आजच घेण्याची शक्यता आहे, असं अस्लम शेख म्हणाले. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सर्वच अधिकाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याबाबत राज्य सरकारने निश्चित केलं आहे. हा लॉकडाउन कधी करायचा याबाबत कालपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अधिक वेळ दवडण्यात अर्थ नसल्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे, असं अस्लम शेख म्हणाले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

राज्यात कोरोनामुळे 960 रूग्ण ,मृत्युमुखी नवीन प्रकरणे कमी ...

राज्यात कोरोनामुळे 960 रूग्ण ,मृत्युमुखी नवीन प्रकरणे कमी झाली!
राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये नक्कीच घट झाली आहे, परंतु मृत्यू होणाऱ्या ...

कोरोनालाही जगण्याचा अधिकार - भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत

कोरोनालाही जगण्याचा अधिकार - भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत
कोरोनाही एक जीव आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं वक्तव्यं उत्तराखंडचे माजी ...

'म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्सचा अतिवापर टाळायला ...

'म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्सचा अतिवापर टाळायला हवा'
कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असताना, रुग्णालयांमध्ये इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकोल पाळणं ...

गंगेत वाहणारे मृतहेद भारताचे नाहीत - कंगना राणावत

गंगेत वाहणारे मृतहेद भारताचे नाहीत - कंगना राणावत
सध्या गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांचे व्हायरल होणारे व्हीडिओ हे भारतातले नसून नायजेरियाचे ...

जागतिक साथ यावर्षी अधिक भीषण - WHO

जागतिक साथ यावर्षी अधिक भीषण - WHO
कोरोना व्हायसच्या संसर्गाचं दुसरं वर्ष हे अधिक भीषण असणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने ...