सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:49 IST)

राहत्या घरी जिलेटीच्या कांड्यांचा स्फोट करुन आत्महत्या

मेळघाटमधील धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत आठ किलोमीटर अंतरावरील कळमखार गावातील रहिवाशी रामू गायकवाड  (३५)  ने आपल्या राहत्या घरी जिलेटीच्या कांड्यांचा  स्फोट करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
रामू गायकवाड हा मजूरी करायचा, पत्नीसोबत वाद झाला त्यानंतर पत्नी आई-वडिलांच्या घरात राहत होती. मधू रात्री घरात एकटाच झोपला होता त्यानंतर त्याने जिलेटीन कांड्या गळ्यात बांधल्या आणि स्फोट करत आत्महत्या केली आहे. मोठा आवाज झाल्याने बाजूचे लोक धावत आले तेव्हा पाहिलं तर त्याच्या शरीराचे तुकडे आजूबाजूला दिसले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.