सोमवार, 2 ऑक्टोबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: रविवार, 26 जून 2022 (15:49 IST)

Yoga Tips: पाठीचा कणा सरळ आणि लवचिक ठेवण्यासाठी हे आसन करा

शरीर सरळ आणि स्थिर ठेवण्यासाठी मणक्याची विशेष भूमिका असते. वाकणे, चालणे यासह शरीराचा समतोल राखण्यासाठी मणक्याचे निरोगी असणे आवश्यक मानले जाते.यामुळेच आपल्याला स्पर्श, दाब, थंडी, उष्णता, वेदना इत्यादी संवेदना जाणवतात. म्हणजेच शरीराच्या जडणघडणीपासून ते संवेदनांपर्यंत पाठीचा कणा निरोगी असणे आवश्यक मानले जाते.मात्र, गेल्या काही वर्षांपासून जीवनशैलीतील बिघाडामुळे लोकांमध्ये मणक्याशी संबंधित समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
 
मणक्याची रचना आणि कार्ये चांगली ठेवण्यासाठी, योगासनांचा नित्यक्रमात समावेश करणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. पाठीचा कणा सरळ आणि लवचिक ठेवण्यासाठी योगासने उपयुक्त आहेत.योगासन करण्याची सवय देखील फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया.
 
* मार्जरी आसन 
सर्वप्रथम गुडघे आणि हातावर उभे राहा आणि पाठीला वर उचलून धरा.श्वास आत घेत डोकं छताकडे न्यावे आणि शरीराची कंबरेकडील बाजू वाकवा. श्वास सोडताना हनुवटी छातीला लावून ठेवा आणि पाठीला वर उचला.या आसनाचा सराव चार ते पाच वेळा करा.
 
* पादहस्तासन-
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम आपण पायांवर सरळ उभे राहा आणि हाताला शरीराच्या जवळ ठेवा.श्वास आत घेऊन हाताला डोक्याच्या वर घेऊन जा आणि वर ओढा.श्वास सोडताना पाठीचा कणा सरळ ठेवा हात आणि गुडघे सरळ ठेवून पुढे वाका आपले हात जमिनीवर ठेवा आणि टाचांना धरून ठेवा.