मधुमेह असो वा सर्दी-खोकला, केवळ दररोज 5 मिनिटे हे योगासन करा आणि रोगांना दूर पळवा

yoga clothes
Last Modified मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (14:56 IST)
आपल्या जीवनशैलीत आजारांपासून काही खास योगासन वाचवतात. एकूण 84 प्रकाराचे शास्त्रीय योग आसन असतात. योगाचे 8 नियम सांगितले आहे. महर्षी पंतंजली यांनी योगाचे एकूण 196 योगसूत्र सांगितले आहे.

सध्याच्या काळात आपल्या बदलत्या आणि बिघडलेल्या जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे शरीराचे आरोग्य बिघडत आहे. कमी वयातच पाठदुखी, मायग्रेन, थॉयराइड, मधुमेह, उच्च रक्तदाब सारखे आजार वाढतच चालले आहेत. या पैकी काही आजार तर योगासनाने दूर केले जाऊ शकतात. त्यासाठी गरज आहे फक्त आपल्या 5 मिनिटाच्या वेळेची. जर आपण हे योगासन करण्यासाठी फक्त 5 मिनिटे दिले तर आपणास या त्रासापासून आराम मिळू शकतो.
* पाठ दुखी आणि त्याची कारणे -
स्नायूंमध्ये ताण येणं, बसायची आणि उठण्याची पद्धत चुकीची असणं, गरोदरपणी किंवा क्षमतेपेक्षा अधिक श्रम करणं.

हलासन - जमिनीवर झोपा आणि आपले दोन्ही तळहात जमिनीवर ठेवा. दोन्ही पायाचे टाच आणि पंजे जवळ ठेवा. दोन्ही पायांना हळुवार उचलून 90 अंशाचा कोण बनवत डोक्याच्या मागे घेऊन जावे पाय सरळच ठेवा. हाताला जमिनीवरच ठेवा. गुडघे कपाळावर सरळच ठेवा, दुमडू नये. 1-2 मिनिटे अशा स्थितीत राहून श्वास घ्या आणि सोडा. हळुवार पूर्ववत या. पाय सरळच ठेवायचे आहे हे लक्षात असू द्या.
या शिवाय त्रिकोणासन, पश्चिमोत्तासन, सुप्तवक्रासन, सेतू बंधासन, भुजंगासन हे आसन देखील फायदेशीर आहे.

हे करून बघा- मोहरीचे तेल गरम करून या मध्ये 8 ते 10 लसणाच्या कांड्या टाकून शिजवून घ्या. या तेलाला थंड करून पाठीची मॉलिश 10 ते 15 मिनिटे करा. आपणास आराम वाटेल.

* मायग्रेन आणि त्याची कारणे -
पुरेशी झोप न होणं, ताण-तणाव, शरीरात पोषक घटकांचा अभाव, मद्यपान करणं आणि ऍलर्जी होणं.
अनुलोम-विलोम प्राणायाम करावं -
सुखासनात बसा, कंबर सरळ ठेवा. अनामिक आणि कनिष्ठबोटाने डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. काही काळ थांबा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. थांबा. पुन्हा उजव्या नाकपुडीने हळुवार श्वास घ्या. श्वास हळुवार आत घ्या आणि सोडा. आपल्याला ही प्रक्रिया पुन्हा-पुन्हा 10 मिनिटे करावयाची आहे.
या शिवाय भुजंगासन आणि ब्रह्ममुद्रा हे आसन देखील फायदेशीर आहेत.

हे करून बघावे- अर्धा ग्लास पालक आणि अर्धा ग्लास गाजराचा रस मिसळून प्यावे.
* मधुमेह आणि त्याची कारणे -
चुकीची जीवनशैली, खाण्या-पिण्यात चुका होणं, ताण, वंशानुगत, लठ्ठपणा आणि वाढते वय.

नौकासन करावं -
जमिनीवर सरळ झोपा. डोकं आणि खांदे वर करा. पायांना सरळ उचला. हात पाय आणि डोकं सरळ रेषेत ठेवा. काही काळ अशाच स्थितीमध्ये राहा नंतर पूर्व स्थितीत या. ही प्रक्रिया किमान 3 ते 4 वेळा करावी.
या शिवाय हलासन, बालासन, शवासन देखील फायदेशीर आसन आहेत.
हे करून बघा- सकाळी अनोश्यापोटी अर्धाकप कारल्याचे रस प्यावं. नियमानं कोमट दूध घ्या.

* सर्दी-पडसे आणि त्याची कारणे -
चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असल्यास, विपरीत हवामानात जास्तकाळ राहणं, व्हायरस, हंगामात बदल होणं.

सर्वांगासन करा- पाठीवर झोपा. दोन्ही हातांना जमिनीवर ठेवा. श्वास घेत पायांना वर उचला. पायांना वर घेत हाताने कंबरेला आधार द्या .पायांना 90 अंशाच्या किंवा 120 अंशावर नेऊन कंबरेखाली हात लावा. दोन्ही पाय जवळ चिटकवून सरळ करा. काही काळ तसेच थांबा नंतर पूर्वस्थितीत या.
या शिवाय आपण शवासन, मकरासन आणि धनुरासन देखील करू शकता.
हे करून बघा-
1 कप पाण्यात एक चमचा हळद, 3 -4 तुळशीचे पान टाकून 10 मिनिटा पर्यंत उकळवून घ्या. या मध्ये एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यावा.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

असं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?

असं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?
कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?

अकबर बिरबल कथा- अखेर बिरबलाने चोर पकडला

अकबर बिरबल कथा-   अखेर बिरबलाने चोर पकडला
एकदा एक व्यापारी व्यवसायाच्या कामाने काही दिवसांसाठी राज्यातून बाहेर गेला होता. काम ...

मुलांसाठी बनवा चविष्ट ब्रेड उत्तपा

मुलांसाठी बनवा चविष्ट ब्रेड उत्तपा
दररोज एकच नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे आणि घरात ब्रेड आणि रवा सगळेच आहे मग आपण ह्याचा वापर ...

प्लॅस्टिकच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी हे सोपे उपाय ...

प्लॅस्टिकच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी हे सोपे उपाय अवलंबवा
आजकाल प्लॅस्टिकच्या भांडी बऱ्याच पैकी ट्रेंड मध्ये आहे. प्रत्येक जण स्टीलच्या भांड्यांना ...

रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी या 5 गोष्टी वापरा

रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी  या 5 गोष्टी वापरा
आजच्या युगात रोगराही वाढली आहे की कधीही आपल्याला बळी बनवू शकते आणि जेव्हा पासून कोरोना ...