रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2019 (17:14 IST)

उर्मिला मातोंडकरच्या प्रचार सभेत गोंधळ

उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची बोरीवली रेल्वे स्थानकाजवळ प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेदरम्यान भाजप समर्थकांनी नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यातून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यामुळे काही काळ त्याठीकाणी तणावाचे वातावरण होते. 
 
यासंदर्भात उर्मिलाला विचारले असता उर्मिलाने सांगितले की, सभेत गोंधळ निर्माण करणारे भाजपचे भाड्याचे गंड होते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना उर्मिला मांतोडकर म्हणाले की, ‘परवानगी घेऊन सभा व्यवस्थित सुरु होती. परंतु, या सभेत भाजपचे गुंड घुसले. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आम्ही अगोदर याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, त्यांनी अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पकडण्यासाठी गेले असता सगळ्यांनी पळ काढला.’