बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 जानेवारी 2025 (20:35 IST)

लघू कथा : लोभी कुत्र्याची गोष्ट

Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक लोभी कुत्रा राहत होता. तो अन्नाच्या शोधात तो गावभर फिरत असे. तो इतका लोभी होता की त्याला जे काही खायला मिळालं ते कमी वाटायचे. 
 
पण त्याची गावातील इतर कुत्र्यांशी चांगली मैत्री होती, आता मात्र त्याच्या या सवयीमुळे सर्वजण त्याच्यापासून दूर राहू लागले, पण त्याला त्याची पर्वा नव्हती, त्याला फक्त त्याच्या खाण्याची काळजी होती. जवळून जाताना कोणी ना कोणी त्याला खायला देत असे. त्याला जे काही खायला मिळेल ते तो एकटाच खाऊन टाकायचा.
 
तसेच एके दिवशी त्याला कुठूनतरी एक हाड सापडलं. हाड बघून त्याला खूप आनंद झाला. एकट्यानेच त्याचा आनंद घ्यावा असे त्याला वाटले. असा विचार करत तो गावातून जंगलाकडे जाऊ लागला. वाटेत नदी ओलांडत असताना त्याची नजर खाली असलेल्या नदीच्या साचलेल्या पाण्यावर पडली. नदीच्या पाण्यात आपलाच चेहरा दिसतोय हेही त्याला कळले नाही. त्याला वाटले की खाली एक कुत्रा देखील आहे, ज्याने देखील हाड तोंडात धरले आहे. त्याने विचार केला की मी त्याचे हाडही का हिसकावून घेऊ नये, तर माझ्याकडे दोन हाडे असतील. मग मी आनंदाने एकाच वेळी दोन हाडे खाऊ शकेन. असा विचार करून त्याने पाण्यात उडी मारताच त्याच्या तोंडातील हाड देखील त्याच्यासकट नदीत पडले.पाण्यातून तो कसाबसा बाहेर आला.  तसेच त्याने केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला.
तात्पर्य : कधीही लोभ करू नये. लोभी असण्याने नुकसान होते.

Edited By- Dhanashri Naik