बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2025 (12:45 IST)

चिकन तवा फ्राय रेसिपी

Chicken Tawa Fry
साहित्य-
चिकन - 500 ग्रॅम
आले लसूण पेस्ट - टीस्पून
धणेपूड - अर्धा टीस्पून
चवीनुसार मीठ
लिंबाचा रस - एक टीस्पून
हळद - एक टीस्पून
बेसन - एक चमचा
कढीपत्ता
तेल - दोन चमचे
तिखट - अर्धा टीस्पून
बटर - तीन चमचे
कोथिंबीर - दोन चमचे

कृती-
सर्वात आधी चिकन स्वच्छ करून घ्यावे. चिकन स्वच्छ ​​केल्यानंतर त्याचे चौकोनी तुकडे करून एका मोठ्या भांड्यात ठेवावे. यानंतर चिकनमध्ये बेसन, लिंबाचा रस, आले-लसूण पेस्ट, हळद, धणेपूड, मीठ, तिखट, हलकेसे तेल, एक वाटी पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यावे. आता 10 मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे. 10 मिनिटे मॅरीनेट केल्यानंतर, चिकन पुन्हा एकदा चांगले मिक्स करावे. आता पॅनमध्ये बटर टाकावे. बटर गरम झाल्यावर मॅरीनेट केलेले चिकन पॅनमध्ये ठेवावे. तसेच सर्व बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यावे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. एका प्लेटमध्ये चिकन काढल्यानंतर त्यावर लिंबाचा रस आणि कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपले चिकन तवा फ्राय रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik