रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (12:16 IST)

Oil Free Recipe तेलाशिवाय बनवा हे स्वादिष्ट व्यंजन

पोहा
ऑयल फ्री पोहे बनवण्यासाठी प्रथम पोहे स्वच्छ धुवून भिजवावेत. आता त्यात हळद, मीठ, थोडी साखर, लिंबाचा रस आणि लाल तिखट घालून मिक्स करा. आता स्टीमरमध्ये 5 मिनिटे गरम करा. स्टीमर प्री-हिट असल्याची खात्री करा.
 
स्टफ्ड इडली
स्टफ्ड इडली अतिशय चवदार आणि आरोग्यदायी नाश्ता आहे. हे करण्यासाठी तुम्ही रवा किंवा तांदळाचे पीठ वापरू शकता. स्टफिंगसाठी, उकडलेल्या बटाट्यामध्ये टोमॅटो, कोबी, कोथिंबीर यांसारख्या तुमच्या आवडीच्या भाज्या मिसळून स्टफिंग तयार करा. आता छोट्या टिक्की बनवा आणि इडली मेकरमध्ये थोडे पीठ टाका आणि नंतर टिक्की घाला, वर थोडे इडली पिठ घाला झाकल्यावर 20 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा, तुमचा निरोगी आणि चवदार नाश्ता तयार आहे.
 
मोमोज
स्टीम मोमोजमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. जसे कोबी, गाजर, लसूण, कांदा, हवे असल्यास त्यात चीजही घालू शकता. त्याचे पीठ मळताना त्यात थोडे मीठ टाका, चव वाढेल. आता तुम्ही मेयोनेझ आणि रेड चिली सॉस बरोबर सर्व्ह करू शकता.