मोस्ट वांटेड दहशतवादी आरिज खानला अटक
बटला हाउस एनकाउंटरनंतर फरार कुख्यात दहशतवादी आरिज खान उर्फ जुनैद याला पोलिसांनी अटक केली. त्यावर 15 लाख रुपये इनाम घोषित करण्यात आला होता.
सूत्रांप्रमाणे जुनैद दिल्ली, यूपी, अहमदाबाद आणि जयपूर येथे झालेल्या ब्लास्टमध्ये सामील होता. त्याला दिल्ली पोलिसाच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.
उल्लेखनीय आहे की 19 सप्टेंबर 2008 रोजी दिल्ली येथील जामिया नगर क्षेत्रात मुजाहिदीनचे संदिग्ध दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत सुरक्षा बळांनी दोन संदिग्ध दहशतवादी आतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद याला ठार मारले होते. या चकमकीत एनकाउंटर तज्ज्ञ आणि दिल्ली पोलिस निरीक्षक मोहन चंद शर्मा शहीद झाले होते.