बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated: मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (16:19 IST)

हैदराबादमध्ये निजाम वस्तू संग्रहालयात कोट्यावधीची चोरी

हैदराबादमध्ये निजाम वस्तू संग्रहालयात चोरी झाली आहे. सोन्याचा रत्नजडित डबा, रत्नजडीत कप आणि अनेक मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. सुमारे २ किलो वजनाचा तीन कप्पे असलेला टिफिन बॉक्स चोरीला गेला आहे. ज्यावर हिरे आणि रत्नं जडवण्यात आली होती. निजामाचा सोन्याचा कप आणि एक चमचा देखील चोरीला गेला आहे.या संग्रहालयात  निजाम काळातील अनेक मौल्यवान वस्तू आहेत. रविवारी मध्यरात्री ही चोरी झाली. या सगळ्या वस्तूंची ५० कोटींपेक्षा अधिक आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून याद्वारे चोरांचा शोध घेत आहे. पोलिसांची १० पथके चोरांचा शोध घेत आहे. या वस्तू संग्रहालयात सुमारे ४५० मौल्यवान वस्तू आहेत.