गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्र 2024
  3. नवरात्र संस्कृति
Written By

Kanya Pujan 2024 कन्या पूजन कसे करावे, नियम जाणून घ्या

kanya pujan gift ideas
Kanya Pujan सनातन धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. नवरात्रीमध्ये कन्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि नऊ दिवस उपवासही केला जातो. व्रतानंतर मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार भोजन करून दक्षिणा दिली जाते. असे मानले जाते की जो व्यक्ती अशा प्रकारे मुलीची पूजा करतो, माता दुर्गा भक्तावर प्रसन्न होते.
 
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मुलींची पूजा सुरू होत असली तरी प्रामुख्याने सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी या मुलींना नऊ देवींचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. तर चला जाणून घेऊया कन्या पूजेबद्दल सविस्तर माहिती.
 
कन्या पूजेचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये कन्यापूजेला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या काळात नऊ मुलींची नऊ देवी म्हणून पूजा केली जाते. तसेच एखाद्याच्या क्षमतेनुसार त्यांना अन्नदान केले जाते. असे मानले जाते की जे लोक नवरात्रीच्या अष्टमी आणि दशमी तिथीला कन्येची पूजा करतात आणि प्रसाद घेऊन उपवास संपवतात, त्यांना माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार अष्टमीच्या दिवशी कन्येची पूजा केल्यास शुभ फळ मिळते.
 
कन्या पूजन कसे करावे
धार्मिक पद्धतीनुसार कन्या पूजनासाठी कन्यांना एका दिवसापूर्वी सन्मानासह निमंत्रण द्यावे.
कन्या पूजनासाठी मुलींना इकडून-तिकडून गोळा करुन बोलावणे योग्य नाही.
जेव्हा कन्या आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा पूर्ण कुटुंबाने त्यांच्यावर पुष्प वर्षा करुन त्यांचे स्वागत केले पाहिजे. यावेळी देवीचा जयकारा करावा.
कन्या पूजन करताना कन्यांना स्वच्छ जागेवर बसवले पाहिजे आणि स्वच्छ पाण्याने त्यांचे पाय धुतले पाहिजे.
पाय धुतलेल्या पाण्याला डोक्यावर लावून चरणस्पर्श करुन आशीर्वाद घ्यावा.
यानंतर कन्यांच्या कपाळावर कुंकु लावून त्यांच्यावर फुलं आणि अक्षता वाहाव्या.
कन्या पूजनात कन्यांच्या आवडीचे पदार्थ करावे आणि यथाशक्ती दक्षिणा आणि भेट वस्तू द्यावा.
धार्मिक मान्यतांनुसार कन्यापूजेच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा की ज्या मुलींची पूजा केली जात आहे त्यांचे वय 10 वर्षांच्या आत असावे.
तसेच मुलींसोबत एक मुलगा असावा ज्याला हनुमानाचे रूप मानावे.