बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मे 2022 (12:59 IST)

पुण्यात बसची 8 गाड्यांना धडक

पुणे- शहरातील कुमठेकर रोडवर अचानक पीएमपीएल बसचे ब्रेक फेल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे या बसने 8 वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे.
 
ही बस हडपसरला चालली होती. कुमठेकर रोडवर अचानक बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी बसने 8 वाहनांना धडक दिली आणि भिंतीला जाऊन आदळली. या अपघातात 2 ते 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पीएमपीएल व्यवस्थापनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बस हटवण्यात आली आहे.