गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (16:01 IST)

नर भक्षक वाघिणीला पकडण्यासाठी आता वनविभाग घेतय हत्तींची मदत

यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीची मोठी दहशत आहे आणि त्याच वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करीत आहे मात्र त्यांच्या प्रयत्नाला पाहिजे त्या पद्धतीने यश येत नसल्याने आता वन विभागाने आपली रणनीती बदलविली आहे यासाठी वन विभागाने मध्य प्रदेशच्या कान्हा राष्ट्रीय उद्यान येथील चार हत्ती या भागात बोलाविण्यात आले आहे आणि याच चार हत्तीच्या प्रयत्नावर वाघीण जेरबंद करण्याची मोहीम सध्या केंद्रित झाली आहे.
 
मध्यप्रदेशच्या कान्हा येथून आणलेल्या चार हत्तीच्या साहाय्याने नरभक्षक वाघीण पकडण्याच्या मोहीमेची आखणी वन विभाग करीत आहेत. आता पर्यंत या भागातील 13 नागरिकांचा वाघिणीने बळी घेतला आहे आणि त्यामुळे तिला पकडण्याची “T1 टायगर कॅपचर मिशन”, ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
पूर्वी दोन हत्ती कान्न्हा येथून येथे आले होते आता पुन्हा दोन हत्ती येथे दाखल झाले आहेत .
विशेष म्हणजे या भागात आता प्रधान मुख्य वन संरक्षक मिश्रा साहेब आणि लिमये साहेब येथे आले असून त्यांच्या मार्गदर्शनात मोहीम राबविण्यात येत आहे .
हे चार हत्ती विशिष्ट भूभागावर वेगवेगळ्या दिशेने जाऊन वाघिणीचा ठाव ठिकाणा शोधतील त्याची कितपत मदत या मोहिमेला होते यावर सर्वांचे लक्ष राहणार आहे