बुधवार, 1 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (15:18 IST)

पोलीस कर्मचाऱ्याने ओवेसीला ठोठावला 200 रुपयांचा दंड, 5000 चे बक्षीस

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पोलिसांनी ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’(AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनचालकाला त्याच्या वाहनावर 'नंबर प्लेट' नसल्याबद्दल 200 रुपयांचा दंड ठोठावला. त्यावर अधिकाऱ्यांनी त्याला 5 हजारांचे बक्षीसही दिले.
 
एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओवेसी मंगळवारी सोलापुरात आले होते. ओवेसींच्या एसयूव्हीच्या चालकाला दंड करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी नंतर पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले.
 
ते म्हणाले की, एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी एसयूव्ही वाहनातून सोलापूरच्या सदर बाजार भागातील सरकारी गेस्ट हाऊसवर पोहोचले आणि विश्रांतीसाठी गेले. घटनास्थळी तैनात असलेले पोलीस निरीक्षक रमेश चिंतानकीडी यांना या नेत्याच्या गाडीला समोरील बाजूस ‘नंबर प्लेट’ नसल्याचे आढळून आले.
 
ते म्हणाले की, त्यानंतर रमेश यांनी ओवेसीच्या ड्रायव्हरला 'नंबर प्लेट' नसल्याबद्दल 200 रुपये दंड भरण्यास सांगितले. यानंतर ओवेसी यांचे काही समर्थक गेस्ट हाऊसबाहेर जमले आणि त्यानंतर काही वरिष्ठ पोलीस अधिकारीही तेथे पोहोचले.
 
वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी वाहनचालकाकडून 200 रुपये दंड वसूल केला. त्यानंतर सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी एपीआय रमेश चिंतानकीडी यांना त्यांच्या कृतीबद्दल 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविले.