रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : शनिवार, 20 मार्च 2021 (19:05 IST)

शरीरातील फॅट कमी करण्यासाठी हे योगासन करा

कोणताही योगासनांची आणि व्यायामाची सुरुवात स्ट्रेचिंग करण्यापासून होते. वार्मअप आणि स्ट्रेचिंग करून अवयवांना मोकळे केले जाते. स्ट्रेचिंग करण्याचे अनेक फायदे आहे. पायांना स्ट्रेच करताना वेदना जाणवते. परंतु सर्वात जास्त फायदा त्यापासूनच मिळतो. शरीरातील लठ्ठपणा कमी होतो. या व्यतिरिक्त स्ट्रेचिंग केल्याने अनेक फायदे मिळतात. चला तर मग स्ट्रेचिंग  केल्याचे फायदे जाणून घेऊ या.   
 
* शरीर लवचिक होत -नवीन नवीन योग करणाऱ्यांना हे शक्य नाही की ते कोणतेही आसन व्यवस्थितरीत्या करू शकतील, परंतु दररोज स्ट्रेचिंगचा सराव केल्याने शरीरात लवचिकता येते. या मुळे पाय उघडण्यात आणि दुमडण्यात काहीच त्रास होत नाही. वर चढ उतार करण्यासाठी देखील काहीच त्रास होत नाही. म्हणून पायाच्या स्ट्रेचिंगचा सराव नियमितपणे करावा. 
 
* तीन अवयवांचा लठ्ठपणा कमी होतो- पाय स्ट्रेच केल्याने पोट,मांडी आणि कुल्ह्यांचा लठ्ठपणा कमी होतो कारण स्ट्रेचिंग करताना या अवयवांवर ताण पडतो. स्ट्रेचिंग करताना आपण पुढे वाकता तर यामुळे आपले पोट कमी होण्याची शक्यता असते. नियमितपणे स्ट्रेचिंग चा सराव करणाऱ्याचे हे तीन अवयव योग्य आकारात येऊ लागतात. स्त्रियांसाठी हे योग्य आहे आणि त्यांनी ह्याचे नियमितपणे सराव करायला पाहिजे. 
 
* स्नायूंना बळकट करतात- स्ट्रेचिंग केल्याने पाय,कुल्हे,या अवयवांच्या स्नायू बळकट होतात. 30 प्लस झाल्यावर शक्य तितके स्ट्रेचिंग करावे. लहानपणा पासून स्ट्रेचिंग करणाऱ्या मुलांचे स्नायू कमकुवत राहत नाही. जर आपली इच्छा आहे की आपले स्नायू देखील बळकट असावे तर यासाठी आपण सुरुवाती पासून स्ट्रेचिंग करावे.