मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

बीडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली ताकद टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून भाजप आणि विशेषतः पंकजा मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.
 
बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणूक जाहीर होताच मेटे यांनी राज्यात महायुतीसोबत मात्र बीडमध्ये भाजप विरोधात अशी भूमिका घेतली होती.