माहिती आहे का ? रेल्वेला 'यातूनही' कोट्यावधीचा महसूल मिळतो

Last Updated: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (10:55 IST)
रेल्वेची आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. एप्रिल २०१९ पासून अवघ्या सहा महिन्यात देशभरात साडेतीन कोटींहून अधिक तिकिटे रद्द झाली व त्यातून ३ हजार ४२० कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी याबाबत भारतीय रेल्वेकडे विचारणा केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १५ कोटी ५३ लाख ७७ हजार ५१३ तिकिटे काढण्यात आली. यातील सामान्य तिकिटे १२ कोटी ४५ लाख ५३ हजार ६०९ इतकी होती, तर तत्काळ तिकिटांची संख्या ३ कोटी ८ लाख २३ हजार ९०४ इतकी होती. यातून भारतीय रेल्वेला १७, ४५३ कोटी ६० लाख १ हजार ११५ रुपयांचा महसूल मिळाला. तर या कालावधीत ३ कोटी ५० लाख ४५ हजार ८८० तिकिटे रद्द झाली. यासाठी कापण्यात आलेल्या ठराविक रकमेतून भारतीय रेल्वेला ३,२० कोटी ११ लाख ९७ हजार १६८ रुपयांचा फायदा झाला.

दरम्यान, एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१९ या ३० महिन्यांच्या कालावधीत देशभरात एकूण ६८ कोटी ६१ लाख ९९ हजार ५६ तिकिटे ‘बुक’ झाली. यातील १४ कोटी ७० लाख ३८ हजार ६८९ तिकिटे तत्काळ होती. एकूण तिकिटांमधून भारतीय रेल्वेला ७७, ९९८ कोटी ७५ लाख ४१ हजार ५१५ रुपयांचा निधी मिळाला. एकूण ‘बुक’ तिकिटांमधून १५ कोटी ६५ लाख ७१ हजार ५७ तिकिटे रद्द करण्यात आली व यातून रेल्वेला १५,१५६ कोटी २६ लाख ७६ हजार ७६५ रुपयांचा महसूल मिळाला.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात ...

टेनिस सामन्यात सट्टेबाजी करीत युक्रेनच्या खेळाडू ...

टेनिस सामन्यात सट्टेबाजी करीत युक्रेनच्या खेळाडू स्टॅनिस्लाव पोपलाव्हस्कीवर बंदी घातली
टेनिस इंटिग्रिटी युनिट (टीआययू) ने युक्रेनचा टेनिसपटू स्टॅनिस्लाव पोपलास्कीवर सामना ...

कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या ...

कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडणार
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच ...

मराठा आरक्षण, पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर

मराठा आरक्षण, पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर
एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य ...

गर्भधारणेनंतर 27 वर्षांनी बाळाचा जन्म, गोठवलेल्या ...

गर्भधारणेनंतर 27 वर्षांनी बाळाचा जन्म, गोठवलेल्या भ्रूणापासून अपत्यप्राप्ती
मॉली गिब्सनचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला. पण तिने नऊ महिन्यांच्या नव्हे तर तब्बल 27 ...