शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (21:56 IST)

'फेअर अँड लव्हली' तून 'फेअर' हा शब्द हटणार

फेअरनेस क्रीम, 'फेअर अँड लव्हली' (Fair & Lovely) आपलं नाव बदलणार आहे. कंपनीने या क्रीमच्या नावातून 'फेअर' हा शब्द हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्रीम बनवणारी कंपनी हिंदुस्तान यूनिलिवरने  क्रीमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
कंपनीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. आम्ही त्वचा सुंदर बनवण्यासाठी उत्पादन बनवत आहोत. कंपनीने निर्णय घेतला आहे की, या क्रीमच्या ब्रँडिंगमध्ये गोरेपणा या शब्दाचा वापर करणार नाही. त्याशिवाय कंपनीने आपल्या ब्रँडचा प्रचार करताना Fairness, Whitening आणि Lightening यांसारख्या शब्दांचाही वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
गेल्या काही वर्षांमध्ये सुंदरता आणि गोरेपणा या मुद्द्यावरुन कंपनीच्या या प्रोडक्टला मोठा विरोध होत आहे. अनेक महिला संघटनांनी या प्रोडक्टला विरोध करत, स्त्रीच्या सौंदर्याचं आकलन तिच्या रंगावरुन होऊ नये, असं म्हटलं आहे. या प्रोडक्टमध्ये, गोरेपणा हा शब्द ज्याप्रकारे वापरला जातो, त्यातून असं दिसतं की, केवळ गोरा रंग असलेल्या स्त्रियाचं सुंदर आहेत, असा आरोप संघटनांनी केला आहे.